Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, गुरुवार २२ सप्टेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष: समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून जाईल. आत्मविश्वास बाळगून काम करा. मनाचा तोल सांभाळावा.  नातेवाईकांशी व्यवहाराने वागा. आज दिनक्रम व्यस्त राहील. 



वृषभ:

धनसंचय वाढीस लागेल. सतत काम करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगा. ग्रहमानाची साथ मिळेल. आजचा दिवस शुभ राहील. इतरांकडून स्तुति केली जाईल.



मिथुन:

खर्चात वाढ होण्याची शक्यता. प्रवास संभवतो. वागणे आणि बोलणे यांचा मेळ साधावा. दिवस धावपळीत जाईल. मात्र नियोजित काम पूर्ण होईल असे नाही. 



कर्क:

व्यक्तिमत्व विकास वृद्धिंगत होईल. विद्यार्थ्यांना चांगला काळ आहे. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. घरातील कामात अडकून पडाल. रचनात्मक कामात आनंद मिळेल. 



सिंह:

प्रामाणिकपणे काम करण्यावर भर द्याल. आपल्या चांगुलपणाला तडा जाऊ देऊ नका. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. मनातील इच्छेला अधिक महत्व द्यावे. कार्यक्षेत्रात उत्तम कामकाज कराल. 



कन्या:

वादाचे प्रसंग टाळावेत. आपल्यातील कला जोपासा. कामाचा अधिक ताण जाणवेल. धार्मिक गोष्टीत मन रमेल. आळस बाजूला सारावा लागेल.



तूळ:

आनंदाची अनुभूति घ्याल. हातातील काम मनापासून करावे. मित्राचा सल्ला मोलाचा ठरेल. कामातून चांगले समाधान मिळेल. आपण घेत असलेल्या मेहनतीला योग्य फळ मिळेल. 



वृश्चिक:

जुने मित्र बरेच दिवसांनी भेटण्याचा योग. नातेवाईक मदतीला येतील.  आहारातील पथ्य पाळा. अंत:करणापासून समोरच्याला मदत करा. प्रेम संबंधातील ओलावा वाढेल. 



धनू:

समस्येचे निराकरण होईल. जास्त काळजी करू नये. स्पर्धा परीक्षेसंदर्भात सकारात्मक वार्ता मिळेल. मित्राने दिलेली शुभ वार्ता मन प्रसन्न करेल. आज आखलेले काम सुरळीत पार पडेल.



मकर:

कामाच्या बाबतीत गाफिल राहू नका.  उगाचच कोणाची खोडी काढू नका. विस्कळीत कामाची घडी नीट बसवावी. कामाचा व्याप वाढता राहील. जवळचा प्रवास करावा लागेल. 



कुंभ:

फसव्या लोकांपासून सावध रहा. विरोधक पराभूत होतील. स्वत:च्या जबाबदारीवर निर्णय घ्या. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. मित्राची योग्य साथ लाभेल. 



मीन:

धार्मिक कामातील गोडी वाढेल.  व्यावसायिक प्रगती साधता येईल. कुटुंबासाठी देखील वेळ काढावा. मनोकामना पूर्ण करणारा दिवस. अति तिखट पदार्थ खाणे टाळावे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies