Type Here to Get Search Results !

'येथे' भीषण अपघात; 9 जणांचा जागीच मृत्यू, 38 जण जखमी!



पलक्कड : केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील दक्कनचेरी भागात केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळ बस आणि पर्यटक बस यांच्यात जोरदार धडक झाली या अपघातात  9 जणांचा मृत्यू झाला, तर 38 जण जखमी झाले आहेत.



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  एर्नाकुलम येथील बॅसिलिओस विद्यानिकेतन वरिष्ठ माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन पर्यटक बस उटीच्या दिशेने निघाली होती. त्याचवेळी KSRTC ची सुपरफास्ट बस कोट्टारक्कराहून कोईम्बतूरला जात होती. मात्र बुधवारी रात्री 11.30 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग 544 वर हा अपघात झाला. अपघातानंतर  बस दलदलीत कोसळली. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच विद्यार्थी, एक शिक्षक आणि तीन केएसआरटीसी सदस्यांचा समावेश आहे.



दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या 38 जणांना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies