मुंबई - केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आयोगाने गोठवलं आहे.निवडणुक आयोगाने हा निर्णय दिल्यानंतर आता निवडणूक आयोगाच्या आदेशाला ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञासोबत चर्चा केल्यानंतर ठाकरे गट हा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, शिंदे गट आणि ठाकरे गटाला धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. तसेच, शिवसेना शिंदे सेना आणि शिवसेना ठाकरे सेना असे नाव दोन्ही गट वापरू शकतात, अशीही माहिती समोर आली आहे.