Type Here to Get Search Results !

काँग्रेसच्या ‘या’ ५ बड्या नेत्यांना ईडीने बजावले समन्स!



नवी दिल्ली: नॅशनल हेराल्ड प्रकरणात तेलंगणा काँग्रेसच्या पाच नेत्यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावले आहे. 



माहितीनुसार, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर होते, त्यावेळी या नेत्यांनी मोठ्या देणग्या दिल्या होत्या. ईडीने या प्रकरणात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नेत्यांना समन्स जारी केले आहेत. या पाच नेत्यांमध्ये मोहम्मद अली शब्बीर, गीता रेड्डी, सुदर्शन रेड्डी, अंजन कुमार आणि गली अनिल यांचा समावेश आहे.



दरम्यान, ईडीने या पाचही नेत्यांना मंगळवारी दिल्ली येथील ईडीच्या मुख्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies