Type Here to Get Search Results !

सापडलेले 1 लाख 25 हजार रूपये केले परत



माणदेश एक्सप्रेस न्युज 

सांगोला : सांगोला शहरातील वासूद रोड, जिव्हाळा कॉलनी येथील गुलाब मच्छिंद्र शिंदे यांना सापडलेले 1 लाख 25 हजार रुपये त्यांनी गहाळ झालेल्यांना परत करत प्रामाणिकपणाचा नवा आदर्श समाजापुढे ठेवला.


याबाबत अधिक माहिती अशी की, जुनोनी येथील गॅस एजन्सीमध्ये काम करणार्‍या दोन कर्मचार्‍यांची 1 लाख 25 हजार रुपये रोख रक्कमेची पिशवी वासूद रोड पाण्याच्या टाकीजवळ अनावधनाने पडली होती. याचवेळी रस्त्यावर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास फिरुन झाल्यावर घराकडे परत जात असताना गुलाब शिंदे यांना ती पिशवी आढळून आली. पिशवीमध्ये पाहिल्यानंतर रक्कम आढळून आले. 


त्यानंतर पाण्याच्या टाकीजवळ दोन युवक अस्वस्थ चेहर्‍याने रस्त्याने वारंवार फिरत असताना त्यांच्या निदर्शनास आले. त्या दोन युवकांचे चेहर्‍यावर भेदरलेले भाव गुलाब शिंदे यांनी अचून टिपले. त्यांच्या नाराज चेहर्‍याकडे पाहत नाराजीचे कारण विचारत अंदाज घेतला. विचारपुस करत असताना त्या दोन युवकांनी साश्रु नयनांनी 1 लाख 25 हजार रुपयांची कहाणी सांगितली. त्यांच्या शब्दातील वास्तव गुलाब शिंदे यांच्या विश्‍वासास पात्र ठरली. पैसे त्यांचेच असल्याची खात्री केली. आणि कुठल्याही मोहाला बळी न पडता 1 लाख 25 हजार रुपयांची पिशवी लगेचच त्यांच्या स्वाधीन केली. 


आजच्या या जगात लोक हक्काचे पैसे बुडवायला कमी करत नाहीत तर कोणा अनोळखी व्यक्तीचे पैसे परत करण्याचा विचार करणारे मोजकेच लोक या जगात आहेत. त्यामुळे गुलाब शिंदे यांच्या प्रामाणिकपणाचे सोशल मिडीयावर कौतुक होत आहे.




إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies