Type Here to Get Search Results !

ब्रेकिंग : सोलापुरात पालकमंत्र्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न : भीम आर्मीचा पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात



माणदेश एक्सप्रेस न्युज

सोलापूर :   सोलापुरच्या पालकमंत्री पदाचा भार स्विकारल्यानंतर मंत्री  चंद्रकांत पाटील हे पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. तर या पदाधिकाऱ्याने काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी देखील केली. यावेळी या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


राज्यातील पालकमंत्र्यांच्या नवीन नियुक्त्या केल्यानंतर सोलापूरच्या पालकमंत्रीपदी जेष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पालकमंत्रीपपदाचा भार स्वीकारल्यानंतर प्रथमच ते सोलापुरात आले होते. यावेळी भीम आर्मीच्या अजय मैदर्गीकर या  पदाधिकाऱ्याने भाजपच्या निषेधाच्या घोषणा देत, खाजगीकरण रद्द करा, अशा घोषणा देत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शाईफेक करण्याच्या प्रयत्न केला होता.


तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर भंडारा उधळला 

धनगर समाजाला एस.टी. चे आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर निवेदन देण्याचा बहाणा करत त्यांच्यावर भंडारा उधळण्यात आला होता. शेखर बंगाळे याने पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर भंडारा उधळत त्यांचा निषेध केला होता.


शेखर बंगाळे ताब्यात 

धनगर समाजाला एस.टी. चे आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर भंडारा उधळण्यारा शेखर बंगाळे या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यासाठी आला होता. परंतु पोलिसांनी मागील घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शेखर बंगाळे याला ताब्यात  घेतले होते.




إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies