Type Here to Get Search Results !

निंबवडे येथे मृतदेह साडलेल्या “त्या” व्यक्तीचा खूनच : आटपाडी पोलिसात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील निंबवडे परीसरामध्ये सापडलेल्या त्या अज्ञात व्यक्तीचा खूनच झाला असून याबाबत आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी, निंबवडे पासून दोन कि.मी. अंतरावर निंबवडे-झरे मार्गावरील असणाऱ्या विक्रम वामन देवडकर यांच्या शेतामध्ये आज दिनांक २६ रोजी  सकाळी ११.०० च्या दरम्यान अज्ञात व्यक्तीला मृतदेह आढळून आला असल्याची माहिती या ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी निंबवडे गावाचे पोलीस पाटील यांना माहिती दिली.


सदरचा  सापडलेला मृतदेह हा अंदाजे 55 ते 60 वर्ष व्यक्तीचा असून अज्ञात हत्याराने त्याच्या डोक्यात व गुप्त भागावर वर करून त्याचा खून करण्यात आला आहे. याबाबत निंबवडेचे पोलीस पाटील प्रविण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम, आटपाडीचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी भेट दिली असून सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.


🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies