Type Here to Get Search Results !

Video ; Bus Accident : बस अपघातात 36 जणांचा मृत्यू; 17 पेक्षा जास्त जण जखमी



जम्मू-काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात एका बसचा भीषण अपघात झाला असूनया दुर्घटनेत 36 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 17 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. सध्या अपघातस्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.


जम्मूवरून किश्तवाडकडे ही बस जास असताना मध्ये दोडा जिल्ह्याजवळ वळणावळणाचे रस्ते असल्याने ड्रायव्हरच बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. दोडा जिल्ह्यात झालेल्या बस अपघातात ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या नातेवाइकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. तसेच जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये दिले जातील, अशी घोषणा मोदींनी केली आहे.


दरम्यान, यातील काही जखमी प्रवाशांना दोडा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर काहींना किश्तवाड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.





إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies