मुढेवाडी : आटपाडी तालुक्यातील मुढेवाडी या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पिरसाहेब यात्रा संपन्न होणार आहे. पिरसाहेब यात्रा ही उद्यापासून सुरु होणार आहे तर या यात्रेचे आयोजन हे खालील प्रमाणे असणार आहे.
गुरुवार दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक १० वाजता मेंढ्या पळविणे ही स्पर्धा आणि संध्याकाळी ठीक ९ वाजता पिरसाहेब दर्ग्यावर गलप चढविणे. त्याचबरोबर शुक्रवार दि. २४ नोव्हेंबर ला भव्य गजी ढोल मंडळ व शनिवार दि. २५ नोव्हेंबर रोजी १० वाजता साखर वाटणे त्याचबरोबर पिरसाहेब यात्रेनिमित्त शनिवार दि. २५ नोव्हेंबर रोजी दुपारी भव्य बैलगाडा शर्यत आणि संध्याकाळी श्वेता इनामदार यांचा लावणीचा बहारदार शो होणार आहे.
तरी सदर यात्रेस मुढेवाडी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे.