Type Here to Get Search Results !

धक्कादायक : ट्रक आणि शाळकरी मुलांच्या रिक्षाची एकमेकांना जोरदार धडक; पोरं रस्त्यावर आपटली अन्; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल



सोशल मीडियावर समोर आलेला व्हिडीओ अक्षरश: अंगावर काटा आणणारा आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे एक धक्कादायक अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. 


शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या एका रिक्षा आणि ट्रकच्या अपघातामध्ये ८ चिमुकली मुलं जखमी झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणम येथील संगम सैराट चित्रपटगृहाजवळ आज सकाळी शाळेत जात असताना ऑटो-रिक्षा आणि ट्रकची धडक झाली.


 ज्यामध्ये आठ शाळकरी मुले जखमी झाली. प्राथमिक माहितीनुसार, ऑटो रिक्षा मुलांना शाळेत घेऊन जात असताना ट्रकने धडक दिली. या धडकेमुळे रिक्षा पलटी झाली, त्यात मुले जखमी झाली. तर त्यामध्ये एक मुलगी गंभीर झाल्याचं सांगितलं जातं आहे.


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलांना रुग्णालयात दाखल केले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies