Type Here to Get Search Results !

धक्कादायक : भाडेकरूने घरमालकाला पाण्याच्या टाकीत बुडवून केला खून! कारण...



पुणे : मोटरसायकल रेस करणे एका घरमालकाला चांगलेच महागात पडले. भाडेकरुने मारहाण करुन पाण्याचे टाकीत बुडवून त्यांना जीवे मारले. लोणी काळभोर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन संतोष राजेंद्र धोत्रे (वय ३७, रा. खंडोबा माळ, ता. हवेली) याला अटक केली आहे.


दादा ज्ञानदेव घुले (वय ५०, रा. खंडोबा माळ, उरुळी देवाची, ता. हवेली) असे खून झालेल्या घरमालकाचे नाव आहे. याबाबत प्रथमेश संतोष घुले (वय १९, रा. घुले वस्ती, मांजरी) यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादा घुले हे घरमालक असून फिर्यादी यांचे चुलते आहेत. संतोष धोत्रे हा घुले यांचा भाडेकरु आहे. दोघेही बांधकामावर मिस्त्री म्हणून काम करतात. सोमवारी दुपारी ते दोघे दारु पिले. त्यानंतर संतोष धोत्रे हा झोपायला गेला. दादा घुले यांनी मोटारसायकल सुरु करुन तिचा एक्सिलेटर वाढवला. मोटारसायकल रेस करुन ठेवल्यामुळे धोत्रे याची झोपमोड झाल्याने त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. 


तेव्हा संतोष याने दादा घुले यांना मारहाण करुन पाण्याच्या टाकीत टाकले. त्यात दादा घुले यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन संतोष धोत्रे याला अटक केली आहे. 


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies