Type Here to Get Search Results !

आश्चर्यचकित: १५० वर्षांच्या जुन्या झाडातून २० वर्षांपासून वाहतेय पाणी! व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही चकित व्हाल...



सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून एका झाडातून चक्क पाणी येत आहे. मॉन्टेनेग्रोमधील डिनोसा गावात एक झाड १५० वर्षांपूर्वीचे जुने झाड आहे. विशेष बाब म्हणजे १९९० च्या दशकापासून या झाडातून पाणी वाहते आहे.


 तसेच मुसळधार पाऊस पडला की, या झाडातून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू होतो. तसेच हे केवळ एक-दोन वर्षांपासून नाही, तर २० ते २५ वर्षांपासून घडते आहे, असे सांगण्यात येत आहे. 


१५० वर्षे जुन्या असणाऱ्या या झाडाच्या परिसरात अनेक भूमिगत झरे आहेत. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा हे झरे ओसंडून वाहतात. तसेच अतिरिक्त दाबामुळे हे पाणी झाडाच्या पोकळ खोडातूनही वाहू लागते.


 बऱ्याचदा दाब इतका जास्त असतो की, हे पाणी अतिशय वेगात झाडामधून येऊ लागते. तसेच हे २०-२५ वर्षांपासून घडते आहे. जमिनीपासून १.५ मीटर उंच असलेल्या या झाडाच्या खोडातून पाणी बाहेर पडू लागते. पण, ही नैसर्गिक गोष्ट आहे, असेसुद्धा सांगण्यात येत आहे.


व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 




إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies