Type Here to Get Search Results !

शेतकरी तरुणाने थंडीपासून वाचण्यासाठी बनविला गावठी जुगाड! व्हिडीओ पाहून तुम्हीही चकित व्हाल...



भारतात जुगाडू लोकांची कमतरता नाही, असं म्हणतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल, हे खरंय. जुगाड म्हणजे एखाद्या निकामी किंवा जुन्या वस्तूंपासून नवीन आणि उपयोगी वस्तू तयार करणे होय. सोशल मीडियावर जुगाडचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. एकापेक्षा एक भन्नाट जुगाड सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये या तरुणाने सुद्धा अनोखा जुगाड करुन स्वेटर बनवले आहे.


शेतकरी रात्रंदिवस उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्याची पर्वा न करता शेतात राबत असतात. हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण करण्यासाठी हा भन्नाट जुगाड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. एकही पैसा खर्च न करता शेतकरी या जुगाडच्या मदतीने थंडीपासून स्वत:ला वाचवू शकतात.


या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की या शेतकरी तरुणाने धान्यांच्या पोत्यांपासून स्वेटर बनवले आहे. स्वेटरमध्ये शर्ट आणि पॅन्ट सुद्धा बनवली आहेत. शेतकऱ्यांकडे धान्यांचे पोते भरपूर असतात त्यामुळे सहज आणि कोणताही खर्च न करता शेतकरी बांधव हे स्वेटर बनवू शकतात. हे पोते खूप उबदार सुद्धा असतात त्यामुळे हे स्वेटर घातल्यानंतर थंडीपासून बचाव करता येईल. हा जुगाड पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.


व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies