Type Here to Get Search Results !

सांगलीचे पोलीस अधीक्षकपदी “यांची” नियुक्ती ; डॉ. बसवराज तेली यांची पदोन्नतीने बदली



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी :  राज्य शासनाने राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले. त्यात सांगली येथे पोलीस अधीक्षक असलेले डॉ. तेली यांची बदली झाली आहे.  


पोलीस उप महानिरीक्षक , गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे या ठिकाणी  ते पदोन्नतीने गेले आहेत. त्यांच्या जागी सांगलीचे पोलीस अधीक्षक म्हणून प्रवीण घुगे यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे.


संदीप घुगे यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सेवा केली आहे. मालेगावचे अपर  पोलिस अधीक्षक म्हणून संदीप घुगे यांनी काम केले होते. तसेच ते अकोला येथेची पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी आपली सेवा बजावली आहे. 


अकोल्यात येण्यापूर्वी घुगे हे नवी मुंबई येथे एसआरपीएफचे समदेशक म्हणून कार्यरत होते. सध्या ते पदस्थापनेच्या प्रतीक्षेत होते. परंतु ते आता सांगलीचे नवे पोलीस अधीक्षक असणार आहेत.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies