Type Here to Get Search Results !

सांगलीचे पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांची बदली



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : सांगलीचे पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांची बदली झाली आहे. राज्य शासनाने राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले. त्यात सांगली येथे पोलीस अधीक्षक असलेले डॉ. तेली यांची बदली झाली आहे.  


डॉ. बसवराज तेली हे पोलीस उप महानिरीक्षक , गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे या ठिकाणी  त्यांना पदोन्नतीने  देण्गेयात आलेली आहे. त्यांच्या जागी सांगलीचे पोलीस अधीक्षक म्हणून प्रवीण घुगे यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे.


सन २०१० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले डॉ. तेली हे एमबीबीएस असून ते मूळचे बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील खंदीबुद या गावातील आहेत. पोलीस दलातील त्यांच्या सेवेस पाचोरा (जि. जळगाव) येथून झाली. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून, पुणे येथे शहर उपायुक्त म्हणून काम केले. 


त्यानंतर त्यांनी वर्धा येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर ते नागपूर शहर पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांची सांगलीच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies