Type Here to Get Search Results !

आटपाडी : मुख्य व्यापारी पेठेतील रस्ते कामाची तानाजीराव पाटील यांनी केली पाहणी ; अधिकाऱ्यांना दिल्या सूचना...



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरातील मुख्य व्यापारी पेठेतील सुरु असलेल्या रस्ता कामाची पाहणी सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीपाटील यांनी केली. 


आटपाडी शहरातील मुख्य व्यापारी पेठेतील रस्ता काँक्रिटीकरण कामाची सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्यातील बस स्थानकपासून ते कल्लेश्वर मंदिरा पर्यंत रस्ता कामाची सुरुवात ठेकेदाराने केली आहे. याठिकाणी रस्ता कामासाठी खोदकाम करण्यात आले आहे.


या खोदण्यात आलेल्या रस्ता कामाची पाहणी जिल्हा बँकेचे संचालक संचालक तानाजीराव पाटील यांनी केली. यावेळी त्यांनी रस्त्या कामाची पाहणी करत, ठेकेदाराला कामाला गती देण्याचे काम करण्या बरोबरच काम चांगल्या दर्जाचं काम करण्याच्या सूचना केल्या.


 नगरपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन काम पूर्ण झाले असून पाणी सुरू करण्यासाठी सांगितले. तसेच वीज वितरण कंपनीचे अधिकारी संजय बालटे यांना लाईटचे पोल शिफ्टिंग करणे व पोलवर तारा न वापरता केबल वापरण्याच्या सूचना केल्या. यावेळी दत्तात्रय पाटील (पंच), युवासेना तालुका प्रमुख  मनोज नांगरे-पाटील,  दिनकर पाटील, बाळासाहेब मोटे, पोपट पाटील पंच, अजित पाटील, मच्छिंद्र पाटील, नेताजी पाटील, सुनील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies