Type Here to Get Search Results !

दिघंची येथून मका पोत्यांची चोरी ; आरोपी विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील शेतकऱ्याची मका पोती आरोपीने चोरून नेली असून याप्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी, दिघंची येथील शेतकरी कुबीर सावत यांची दिघंची देशमुख शेरी येथे शेती आहे. या ठिकाणी त्यांनी मका पोती ठेवलेली होती. परंतु आरोपी गंगाराम सोपान लोखंडे रा. पळशी ता. पंढरपूर याने २३ पोती मका व खताची पोती असा ४३ हजार रुपये किमतीच्या मुद्देमालाची चोरी केला आहे.


कुबीर सावत यांच्या फिर्यादी वरून आरोपी गंगाराम लोखंडे यांच्या विरुद्ध आटपाडी पोलिसात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies