Type Here to Get Search Results !

आटपाडी : शेटफळे येथे शेतात डंपर का घातला म्हणून, दोघा भावांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे शेतामध्ये डंपर का घालत आहे, अशी विचारणा केली असता तिघांनी दोन भावांना मारहाण करून शिवीगाळी तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी आरोपी विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी कैलास सिद्राम मोरे हे त्यांच्या डाळींब शेतामध्ये पाहणी करत असताना यावेळी, त्यांच्या शेतामध्ये त्यांना डंपर येत असल्याचे दिसले. यावेळी त्यांनी चालकाला डंपर चालकाला थांबण्यास सांगितले असता, त्याने यावेळी सुनिल मोहन गायकवाड, अनिल मोहन गायकवाड, मोहन मारूती गायकवाड सर्व रा. शेटफळे यांना या ठिकाणी बोलविले.


यावेळी आरोपींनी फिर्यादीस  आम्ही आमच्या शेतात माती टाकण्यास आणलेला डंपर तु का थांबवलास असे म्हणून तिघांनीही फिर्यादीस शिवीगाळी करीत हाताने व लाथाबुक्यानी मारहान करण्यास  सुरुवात केली. यावेळी फिर्यादी जोराने आरडाओरड केल्याने डाळिबाच्या बागेत असलेला फिर्यादीचा चुलत भाऊ महेश मोरे हा पळत येवून भांडणे सोडवू लागला. 


त्यावेळी आरोपी  सुनिल मोहन गायकवाड याने खाली पडलेला दगड हातात घेवून फिर्यादीला मारहाण केली. तर महेश मोरे यास देखील वरील तिघांनी लाथाबुक्यांनी मारहान करुन फिर्यादी व फिर्यादीचे भाऊ दोंघाना तुम्ही परत आमच्या आडवे आला ती म्हाला जिवंत सोडत नाही, अशी धमकी दिली आहे.


याबाबत आटपाडी पोलिसात फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,पोलीस अधिक तपास करत आहेत.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies