Type Here to Get Search Results !

दिघंची : युवतीची सोशल मिडियावरून बदनामी, ठरलेल्या पतीला पाठविले फोटो,व्हीडीओ : करगणीतील आरोपी विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : दिघंची ता. आटपाडी, जि. सांगली येथे राहण्यास असलेल्या १९ वर्षीय  युवतीची सोशल मिडियावरून बदनामी करत, लग्न ठरलेल्या पतीला बदनामीकारक फोटो व व्हिडीओ पाठवून बदनामी केल्या प्रकरणी करगणी येथील आरोपी विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी, मुळची बिळूर ता. जत येथील असणारी व सध्या दिघंची येथे १९ वर्षीय युवती शिक्षणासाठी राहण्यास आहे. सदर युवतीचे लग्न हे शिराळा येथील युवकाशी ठरलेले होते. परंतु करगणी येथील आरोपी राहून बबन जाधव याने सदर युवतीचे फोटो व व्हिडीओ हे होणाऱ्या पतीला पाठविले. यामुळे सदर युवतीच्या लग्नाकरिता खर्च केलेला वाया गेल्याने नुकसान झाले.


याबाबत सदर युवतीने आरोपी राहून बबन जाधव रा. करगणी याच्या विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल केला असून सदर प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies