Type Here to Get Search Results !

आटपाडी : घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी “यांची” बिनविरोध निवड



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील घाणंद ग्रामपंचायतीचे उपसरपंच धनाजी जुगदर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदी प्रवीण कदम यांची बिनविरोध निवड झाली.


माजी उपसरपंच धनाजी जुगदर यांनी एक वर्ष पूर्ण झाल्यावर उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपसरपंचपदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागून राहिले होते.  सरपंच कविता कटरे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीसाठी सभा बोलविण्यात आली होती. यावेळी प्रवीण कदम यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड कण्यात आली. 


निवडीनंतर प्रवीण कदम यांचा माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डी. एन. कदम, किसन कटरे, माजी चेअरमन विष्णू आबा जूगदर, माजी सरपंच नारायण ढगे, माजी सरपंच सोना कदम, तानाजीराव रामुगडे, दत्ता झंजे, कटरे गुरुजी, रामचंद्र वाघमोडे, तुकाराम वाघमारे, लव्हाजी होनमाने,  भरत माने  यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दिपक देशमुख यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

 


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies