Type Here to Get Search Results !

सांगली : महिला तलाठी सह कोतवालाला लाच घेताना रंगेहाथ पडकले ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई



माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : हरोली ता. कवठेमहांकाळ येथील तलाठी सह कोतवालाला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले असून यामुळे महसूल प्रशासनामधील लाचखोरीला काही प्रमाणात आळा बसला आहे. तलाठी  श्रीमती. प्रतीभा गणपती लोढे तलाठी हरोली, ता. कवठेमहांकाळ, व युवराज ऊर्फ प्रविण रामचंद्र मोरे, कोतवाल बनेवाडी ता.कवठेमहांकाळ अशी आरोपींची नावे आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार यांचे वडील व चुलती यांनी त्यांचे वडिलोपार्जित जमीनचे सरसनिरस वाटणी बाबत दुय्यम लबंधक कार्यालय कवठेमहांकाळ या ठिकाणी रजिस्टर दस्ताने वाटणीपत्र केले असुन सदर दस्ता वरुन ७/१२ सदरी नावे नोंद होणे करिता तक्रारदार यांचे वडीलांनी तलाठी कार्यालय हरोली येथे अर्ज दाखल केलेला होता.


सदर वाटणीपत्रा वरुन ७/९२ सदरी नोंद घेवून ७/१२ उतारा देणेकरीता तलाठी श्रीमती. प्रतिभा गणपती लोंढे व कोतवाल युवराज ऊर्फ प्रविण रामचंद्र मोरे, यांनी तक्रारदार यांचेकडे ३,५००/- रूपये लाच मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी ०८/०२/२०२४ रोजी अँन्टी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता.


तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक ०८/०२/२०२४ रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे'पडताळणी केली असता त्यामध्ये श्रीमती. प्रतिभा गणपती लोंढे, तलाठी हरोली, ता. कवठेमहांकाळ, व  युवराज ऊर्फ प्रविण रामचंद्र मोरे, कोतवाल बनेवाडी ता.कवठेमहांकाळ यांनी तक्रारदार यांचे वाटणीपत्रा वरुन ७/९२ सदरी नोंद घेवून ७/१२ उतारा देणेकरीता ३,५००/- रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.


त्यानंतर दि.०९/०२/२०२४ रोजी तलाठी कार्यालय, हरोली या ठिकाणी सापळा लावला असता श्रीमती. प्रतिभा गणपती लोंढे, तलाठी हरोली, ता. कवठेमहांकाळ, व श्री. युवराज ऊर्फ प्रविण रामचंद्र मोरे, कोतवाल बनेवाडी ता.कवठेमहांकाळ यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून ३,५००/- रूपये लाच रक्क/म स्विकारले असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्या अनुषंगाने लोकसेवक श्रीमती. प्रतीभा गणपती लोढे, तलाठी हरोली, ता. कवठेमहांकाळ, व  युवराज ऊर्फ प्रविण रामचंद्र मोरे, कोतवाल बनेवाडी ता.कवठेमहांकाळ यांचेविरुध्द कवठेमहांकाळ 'पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.


सदरची कारवाई अमोल तांबे सो पोलीस उप आयुक््तव/पोलीस अधीक्षक, विजय चोधरी सो, अपर पोलीस उप आयुक््तर/अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली संदीप पाटील, पोलीस उप अधीक्षक, पोलीस निरीक्षक, दत्तात्रय पुजारी, पोलीस निरीक्षक श्री. विनायक भिलारे, पोलीस अंमलदार धनंजय खाडे, सोमा माने, चंद्रकांत जाधव, ऋषिकेश बडणीकर, प्रितम चौगुले, अजित पाटील, रामहरी वाघमोडे, सलीम मकानदार, पोपट पाटील, उमेश जाधव, सुदर्शन पाटील, चालक वंटमुरे यांनी केली आहे. 



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies