Type Here to Get Search Results !

अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात संघटन तयार करणार : आम. गोपीचंद पडळकर ; हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेनेच्या तासगाव-पलूस तालुक्यात शाखांचे उद्घाटन संपन्न



माणदेश एक्सप्रेस न्युज : पलूस/प्रतिनिधी : अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात संघटन तयार करणार असून ते राज्यातील सर्वात मोठे अराजकीय संघटन असेल असे प्रयत्न सर्वांनी मिळून करुया असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. पलूस तालुक्यामध्ये हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेनेच्या २५ शाखांचे उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते.


यावेळी बोलताना ते म्हणाले, जर कुठे अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी बापू विरू वाटेगावकर तर गरज पडेल त्या ठिकाणी बाळू मामा झाले पाहिजे. सध्या हक्काचे संघटन तयार झाले असून, लोकांना त्यांचा हक्क मिळणार आहेत. संघटनेमध्ये काम करत असताना यापूर्वी गावामध्ये ठराविक लोकांचे काम आहे हा मोठा न्यूनगंड काढून टाका त्याला, कृष्णा नदीमध्ये बुडवून टाका असे आवाहन देखील त्यांनी केले.


तासगाव तालुक्यातील निमणी, नेहरुनगर, पाचवा मैल, येळावी तर पलूस तालुक्यातील हजारवाडी, बुरुंगवाडी, भिलवडी स्टेशन, वसगडे, खटाव, ब्रम्हनाळ, सुखवाडी, चोपडेवाडी, अंकलखोप, औदुंबर, नागठाणे, बुर्ली, कुंडल, आमणापूर, धनगांव, खंडोबाचीवाडी येथील शाखेचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. 


यावेळी शिवदास बिडगर, ऋषी टकले, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, सागर मलगुंडे, विजय वावरे, सुभाष खांडेकर, कैलास वाघमारे, राहुल पुजारी, बाळू माने, भाऊसाहेब दुधाळ, महादेव पाटील, संदीप रासकर, अनिल पाटील, बाळू पांढरे, नवनाथ रणदिवे, शेखर रणदिवे तसेच शाखाध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य उपस्थित होते. 



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies