Type Here to Get Search Results !

दि. बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेला तब्बल “एवढ्या” कोटीचा नफा : सभासदांना १० टक्के लाभांश देणार : अमरसिंह देशमुख



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्याच्या विकासाची प्रमुख आर्थिक बँक असलेल्या दि. बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेला आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ७.७२ कोटी रुपयांचा नफा झाला असल्याची माहिती बँकेचे संस्थापक तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी दिली.


अमरसिंह देशमुख म्हणाले, बँकेची आर्थिक स्थिती रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे भक्कम असून नियमांचे पालन केल्याने रिझर्व बँकेने पंढरपूर व जत या दोन नवीन शाखा उघडणेस आर्थिक वर्षात परवानगी दिली आहे. त्याचबरोबर रिझर्व बँकेने, दि. बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेला संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र करण्यास परवानगी दिली आहे.


बँकेच्या सध्या १० शाखा व एक प्रधान कार्यालय असून पंढरपूर व जत या दोन नवीन शाखामुळे बँकेचा व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे.  बँकेने ग्राहकांना मोबाईल बँकिंग, UPI, RTGS, NETF, CTS क्लिअरिंग, POS, BBPS, ATM, NACH, FASTTAG, या सर्व DIGITAL सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. बँकेचे सर्व संचालक मंडळ,कर्मचारी, सभासद, ठेवीदार, कर्जदार यांच्या सहकार्यामुळेच तसेच,  बँकेचे चेअरमन दादासाहेब पाटील, व्हा.चेअरमन जयंत देशपांडे, व्यवस्थापकीय संचालक भगवंत पाटील-आडमुठे, सर्व संचालक मंडळ, कर्मचारी यांच्या अथक परिश्रमामुळेच बँकेने भरीव प्रगती केली असल्याचे अमरसिंह देशमुख म्हणाले.


मार्च २०२४ अखेर BDS बँकेची स्थिती 

ठेवी : ४०२.८४ कोटी 

कर्जे : २७८.२२ कोटी 

भाग भांडवल : १८.१५ कोटी 

स्वनिधी : ३७.९३ कोटी 

गुंतवणूक : १६३.१६ कोटी 

ढोबळ नफा : ७.७२ कोटी 

निव्वळ नफा : ४.७९ कोटी 

NPA : सलग वर्ष ०.०० टक्के 

ऑडिट : सतत ‘अ’ वर्ग 

२०२४ मार्च : ६८१.०६ कोटी व्यवसाय






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies