Type Here to Get Search Results !

महत्वाचे : आचारसंहिता कालावधीत सांगली जिल्ह्यात “या” वेळात ध्वनीक्षेपक लावण्यास व वापरण्यास मनाई



माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 नुसार प्राप्त अधिकारान्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी वर्षभरातील विशिष्ट सण, उत्सवादिवशी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यासाठी सवलत देण्याबाबत  दि. 1 फेब्रुवारी 2024 रोजी आदेश जारी केले होते. या आदेशानुसार विशिष्ट सण, उत्सवासाठी ध्वनीची विहित मर्यादा राखून कार्यक्रमासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सवलत देण्यात आली होती.


तथापी आचारसंहितेच्या कालावधीत रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक न लावण्याबाबत निर्देश प्राप्त असल्याने आचारसंहिता कालावधीत रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक लावण्यास / वापरण्यास मनाई केली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.


दि. 1 फेब्रुवारी 2024 रोजीच्या आदेशान्वये शिवजयंती (१ दिवस), ईद-ए-मिलाद (१ दिवस), डॉ. आंबेडकर जयंती (१ दिवस), १ मे महाराष्ट्र दिन (१ दिवस), गणपती उत्सव (गणेश चतुर्थी, पांचवा दिवस, सातवा दिवस, नववा दिवस, अनंत चतुर्दशी, असे ५ दिवस), नवरात्री उत्सव (अष्टमी व नवमी, असे २ दिवस), दिवाळी (१ दिवस लक्ष्मीपूजन), ख्रिसमस (१ दिवस), ३१ डिसेंबर (१ दिवस) तसेच उर्वरित १ दिवस (जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने महत्वाच्या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार सूट) ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सवलत देण्यात आली होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies