Type Here to Get Search Results !

आटपाडीच्या चौंडेश्वरी पतसंस्थेला विक्रमी नफा : चेअरमन राहुल सपाटे यांची माहिती



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : येथील चौंडेश्वरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला ३१ मार्चअखेर १ कोटी २५ लाखांचा नफा झाल्याची माहिती चेअरमन राहुल सपाटे, व्हाईस चेअरमन योगेश रणदिवे, सचिव बालक डोईफोडे यांनी दिली.


संस्थेचे कुटुंबप्रमुख चंद्रकांत दौंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या संचालक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हे यश मिळाले असे त्यांनी स्पष्ट केले. संस्थेच्या ठेवी २२ कोटी आणि कर्जवाटप १७ कोटी आहे. गुंतवणूक १० कोटी, खेळते भागभांडवल २८.६७ कोटी, भागभांडवल २ कोटी, स्वनिधी ३.८५ कोटी, प्रतिसेवक व्यवसाय ५.६७ कोटी आणि एकूण व्यवसाय ३९.७१ कोटी आहे.


संस्थेचा सीआरआर २.७५, एसएलआर ४७.३८, सीडी रेशो ६३.१९ आणि निव्वळ एनपीए १.७ टक्के आहे. संस्थेने सातत्याने अ श्रेणी कायम राखली आहे. ग्राहकाभिमुख आणि तत्पर आधुनिक सुविधा, वृद्धांना घरपोच व्याज देण्याची सोय संस्थेने केली आहे. स्वनिधी ३.८५ कोटी, प्रतिसेवक व्यवसाय ५.६७ कोटी आणि एकूण व्यवसाय ३९.७१ कोटी आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies