Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य - १७ एप्रिल २०२४, जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... मेष -    आजचा दिवस मानसिक व्यग्रतेत जाईल. जास्त भावनावश होऊ नका. त्यामुळे बोलण्यावर संयम न राहून त्रास होऊ शकतो. आईच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. शक्यतो स्थावर संपत्तीची चर्चा टाळावी. अपघाताच्या शक्यतेमुळे वाहन जपून चालवावे व जलाशया पासून दूर राहावे. 


वृषभ -  शरीराने व मनाने मोकळे वाटेल. उत्साह वाढेल. मन संवेदनशील बनेल. कल्पनाशक्ती वाढल्यामुळे काल्पनिक जगाची सफर आपण कराल. कौटुंबिक विषयात रस घ्याल व प्रवासाचे बेत आखाल. 


मिथुन  - काम होण्यास वेळ लागला तरी प्रयत्न चालू ठेवणे हितावह राहील. कामे नक्की पूर्ण होतील. आर्थिक योजनात सुरुवातीला काही अडचणी येतील पण नंतर मार्ग मोकळा होताना दिसेल. नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्यांशी खेळीमेळीच्या वातावरणात कामे करू शकाल. 


कर्क - मित्र व स्नेही यांच्यासह आजचा दिवस आपण उल्हासात घालवू शकाल. प्रवास किंवा सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. भावनाशील व्हाल. 


सिंह -  आपण अती भावनाशील व्हाल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. दलाली, चर्चा व वाद ह्या पासून दूर राहणे हितावह राहील. कोर्ट - कचेरीच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. 


कन्या -  आजचा दिवस आनंदात व उत्साहात जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रात आज लाभ संभवतो. त्यात एखाद्या स्त्रीची भूमिका महत्वाची असेल. मित्रासह एखाद्या रम्य- स्थळी जाल.  


तूळ -  आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी - व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. वरिष्ठांसह महत्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल. पदोन्नती संभवते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. माते कडून फायदा होईल.

 

वृश्चिक - नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सावधपणे कामे करावी लागतील.वरिष्ठांच्या नकारात्मक धोरणाने तुम्हाला त्रास होऊ शकतो. दिवस आळसात जाईल. संततीशी मतभेद होण्याची शक्यता आहे. 

 

धनु -  नवीन कामाची सुरूवात न करणे हितावह राहील. आजारा वरील नवीन उपचारास सुद्धा प्रारंभ न करणे हितावह राहील. वाणी व वर्तन संयमित ठेवणे हिताचे राहील. अती संवेदनशीलतेमुळे मन व्यथित बनेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. पैसा अधिक खर्च होईल. 


मकर -  विविध कारणांनी आपल्या व्यापाराचे विस्तृतीकरण होऊन त्यात वाढ होईल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादी मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल. धन लाभ संभवतो. संततीच्या अभ्यासा विषयी चिंता निर्माण होईल. कामात यश मिळेल. विचार अस्थिर व द्विधा मनःस्थिती होईल. 


कुंभ - आजचा दिवस आनंददायी आहे. कामात यश तसेच कीर्ती मिळेल. कुटुंबियांसह दिवस चांगला जाईल. नोकरी - व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. 


मीन -   आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपण काल्पनिक जगात रमून जाल. विद्यार्थ्यांना आपली हुशारी दाखविता येईल. प्रणयाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. पाण्या पासून शक्यतो दूर राहावे. 


(टीप : माणदेश एक्सप्रेस यातून कोणताही दावा करत नाही. केवळ माहिती पोहचविणे हा उद्देश)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies