Type Here to Get Search Results !

सांगली : देवेंद्र फडणवीस-संभाजी भिडे यांच्यातील भेट ही संजयकाकांसाठी फायद्याची की तोट्याची?



माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे  यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज गुरुवारी (ता.18) सांगलीत  भेट घेतली. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे.


राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  हे उमेदवार संजयकाका पाटील यांचा अर्ज  भरण्यासाठी सांगली येथे हेलिकॉप्टराने कवलापूर विमानतळावर पोहचले. याचवेळी विमानतळावर भिडे देखील त्याठिकाणी उपस्थित होते. हेलिकॉप्टरमधून फडणवीस उतरताच भिडेंनी त्यांची गाठ घेतली. यानंतर दोघांमध्ये काहीवेळ चर्चा झाली.


यावेळी देवेंद्र फडणवीसांचा हात धरून संभाजी भिडेंनी त्यांच्याशी संवाद साधला. यानंतर फडणवीसांनी देखील भिडेंशी कानगोष्टी केल्या. मात्र, या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली. याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. नेमकी चर्चा ही काकांच्या फायद्याची की तोट्याची यावरून  उलटसुलट चर्चा झडू लागल्या आहेत.







إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies