Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, शनिवार २४ सप्टेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष :

आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळेल. नोकरीच्या नवीन संधी चालून येतील. प्रिय व्यक्तीकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. वाहन खरेदीची इच्छा मनात येईल. मुलांबाबतची चिंता दूर होईल. 



वृषभ:

गुंतवणूक करताना जोखीम पत्करू नये. विचार भरकटू देऊ नका. दिवस मध्यम फलदायी असेल. वादाचे मुद्दे टाळावेत. मनाची चलबिचलता जाणवेल.



मिथुन:

अडकलेले धन प्राप्त होण्याची शक्यता. अकारण खर्च टाळावा. वातावरण लक्षात घेऊन काम करावे.  संमिश्र घटनांचा दिवस. कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. 



कर्क:

नोकरदार वर्गाला उत्तम दिवस. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.  नवीन व्यवसायास गती मिळेल. तुमचा मान वाढेल. 



सिंह:

दिवसभरात सकारात्मक वार्ता मिळेल. चोख हिशोब ठेवावा. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. पैसा चांगल्या कामासाठी खर्च कराल. मान, सन्मानात वाढ होईल. 



कन्या:

लोकांकडून वाहवा मिळवाल. उत्तम सामाजिक दर्जा प्राप्त होईल. कामाचा ताण जाणवू शकतो. अति विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. कामातील प्रगतीकडे लक्ष ठेवा.



तूळ:

परिस्थितीचा ताळमेळ साधाल. स्वत:च्या सुखासाठी पैसा खर्च कराल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. प्रतिपक्षावर मात कराल. धनलाभाचे योग जुळून येतील. 



वृश्चिक:

कौटुंबिक ताणतणाव टाळावेत. मुलांची चिंता लागून राहील. अधिकार्‍यांची गाठ पडेल. मित्रांशी जवळीक साधाल. क्रोधावर नियंत्रण ठेवावे.



धनू:

मिळकतीचा नवीन स्त्रोत सापडेल. आहाराची पथ्ये पाळावीत. पैशाच्या बाबतीत हात आखडता घ्याल. जि‍भेवर ताबा ठेवावा. आर्थिक बाजू सुधारेल. 

मकर:

धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. भावंडांशी मतभेदाची शक्यता. दिवस मध्यम फलदायी. व्यापारी वर्गाने सबुरीने घ्यावे. जुन्या विचारांना मनातून काढून टाका.



कुंभ:

महत्त्वाची कागदपत्रे सांभाळावीत. मानसिक स्वास्थ्य ढळू देऊ नका. विनाकारण प्रवास घडेल.  सट्टा, जुगारापासून दूर रहा. नवीन संधी मिळण्याची चिन्हे दिसू लागतील. 



मीन:

कार्य व अधिकार वाढतील. प्रतिस्पर्ध्याबरोबर हुशारीने वागावे. कौशल्याचा वापर करावा लागेल. पैशाची गुंतवणूक समजून उमजून करावी. मानसिक ताण घेऊ नये. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies