Type Here to Get Search Results !

ब्रेकिंग: गेल्या १० दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या मजुरांपर्यंत अखेर पोहोचला कॅमेरा; VIDEO व्हायरल!

 


उत्तराखंडमधील उत्तरकाशीतल्या सिल्क्यारा बोगद्यात गेल्या १० दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन आणि बचाव पथकाचे प्रयत्न चालू आहेत. दरम्यान, बोगद्यात आडकलेल्या मजुरांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 


या व्हिडीओमध्ये बोगद्यात अडकलेले सर्व मजूर दिसत आहेत. बचाव पथकाने मजुरांपर्यंत एका नलिकेद्वारे (पाईप) अन्न पोहोचवण्याचं काम सुरू केलं आहे. याच पाईपमधून त्यांच्यापर्यंत कॅमेरा पोहोचवण्यात आला.


मजुरांपर्यंत अन्न आणि पाणी पोहोचवण्यासाठी सहा इंची नलिका टाकण्यात आली आहे. या नलिकेच्या मदतीने मजुरांपर्यंत खिचडी आणि पाणी पोहोचवण्यात आलं.


 तसेच कॅमेऱ्याच्या सहाय्याने बोगद्यातली परिस्थिती पाहता आली. आतमध्ये लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर आतमध्ये अडकलेल्या मजुरांनी सुरक्षा हेल्मेट घातल्याच व्हिडीओत पाहायला मिळालं. 

अडकलेल्या कामगारांना पुरेसं अन्न आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी रविवारी सकाळी ढिगाऱ्यातून ४२ मीटरपर्यंत सहा इंच व्यासाच्या नलिका टाकण्यात आल्या, असे तिथल्या नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी सांगितले.


 केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वी दुर्घटनास्थळी जाऊन बचावकार्याचा आढावा घेतला. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी देदेखील गडकरींबरोबर उपस्थित होते.


व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 





إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies