Type Here to Get Search Results !

रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने बहिणीचा मृतदेह नेला पाठीवर बांधून; ह्रदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ व्हायरल...

 


सरकारी रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. रुग्णालयातील एका तरुणाला आपल्या बहिणीचा मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळू शकली नाही. अशा स्थितीत त्याला अक्षरश: मृतदेह पाठीला बांधून दुचाकीवरून न्यावा लागला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला असून आता तो व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील औरैयाच्या बिधुना येथील नवीन बस्ती येथे राहणारे प्रबल प्रताप सिंह यांची मुलगी अंजली हिने मंगळवारी सकाळी पाणी गरम करण्यासाठी बादलीत हिटर टाकण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तिला विजेचा धक्का बसून ती गंभीररित्या भाजली गेली. तिला तातडीने शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या डॉक्टरांना मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका मागितली, मात्र डॉक्टरांनी येथे रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगितले.


यानंतर हतबल झालेल्या भावाने बहिणीचा मृतदेह दुचाकीवर ठेवला आणि त्याच्या पाठीला ओढणीनं बांधला. यानंतर त्याने लहान बहिणीला मागे बसवले आणि घराकडे निघाले. हा प्रकार पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिकही हादरले.

 



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies