Type Here to Get Search Results !

९ वर्षांची चिमुकली बेपत्ता; सनी लिओनी या अभिनेत्रीने शोधून देणाऱ्यास ठेवले बक्षीस




अभिनेत्री सनी लिओनीने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. तिने एका ९ वर्षीय मुलीचा फोटो पोस्ट करत ती चिमुकली गायब असल्याची माहिती दिली आहे. 


अनुष्का मोरे ही ९ वर्षांची चिमुकली जोगेश्वरीमधून बेपत्ता झाली आहे. अभिनेत्री सनी लिओनीच्या घरी काम करणाऱ्या महिलेची ती लेक आहे. यामुळेच सनी लिओनी सुद्धा खूप काळजीत पडली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पोलिस आणि लोकांना आवाहन केलं आहे. जिथे कुठे ही मुलगी दिसेल संपर्क साधा अशी विनंती केली आहे. तसंच शोधून आणणाऱ्या किंवा माहिती देणाऱ्यांना रोख रक्कम मिळेल असंही तिने नमूद केलं आहे. 


सनी लिओनी लिहिते,'या चिमुकलीला तिच्या कुटुंबापर्यंत सुरक्षित पोहोचवण्यासाठी मी स्वत: ५० हजार देईन. मुंबई पोलिस आणि पालिकेला विनंती, ही अनुष्का माझ्या घरी काम करणाऱ्या महिलेची मुलगी आहे. अनुष्का काल ८ तारखेला संध्याकाळी ७ पासून जोगेश्वरीच्या बेहराम बागमधून बेपत्ता आहे. ती केवळ ९ वर्षांची आहे आणि तिला शोधण्यात तिचे आईवडील अक्षरश: हतबल झाले आहेत.तिच्याबद्दल कोणालाही माहिती असल्यास ११ हजार रोख देण्यात येतील.'


रकाम करणाऱ्या महिलेच्या मुलीसाठी सनी लिओनीने उचललेलं हे पाऊल पाहून सर्वच तिचं कौतुक करत आहेत. सनी लिओनी माणूस म्हणून किती चांगली आहे याचं उत्तम उदाहरण हे असल्याची कमेंटही एकाने केली आहे. सध्या पोलिस अनुष्का मोरेचा तपास करत आहेत.




إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies