Type Here to Get Search Results !

ज्ञानोबा माऊलीच्या गजरात चिमुकल्यांचा डान्स; व्हिडीओ पाहुन तुम्हीही...



वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. दरवर्षी हजारो वारकरी कार्तिक आणि आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पायी जातात. ही पायी वारी जगभरात प्रसिद्ध आहे.


 वारकरी भजन किर्तनाच्या माध्यमातून विठ्ठलाची भक्ती करताना दिसून येतात. लहानांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत अनेक जण वारकरीच्या रुपात दिसून येतात. वारकरीच्या रुपात ही लोकं सर्व विसरुन विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होताना दिसून येतात. 


सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चिमुकले वारकरी टाळ मृदुंगाच्या तालावर थिकरताना दिसत आहे.


हा व्हायरल व्हिडीओ भव्य किर्तन महोत्सवातील आहे.या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की चिमुकले टाळ मृदुंगाच्या तालावर थिरकताना दिसत आहे.ज्ञानोबा माऊलीच्या गजरात ते रंगलेले दिसत आहे. या चिमुकल्यांनी सुंदर पांढरा पोशाख घातला आहे. कपाळावर टिळा आणि डोक्यावर पांढरी टोपी घातली आहे. त्यांचा पेहराव अत्यंत आकर्षक दिसत आहे.


 व्हिडीओत तुम्हाला एक मोठे बॅनल लावलेले दिसत आहे. त्या बॅनरवरुन कळते की हा व्हिडीओ पंढरपूरच्या जवळ असलेल्या दिघी गावातील आहे. या गावात अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्या दरम्यान किर्तन महोत्सवातील हा व्हिडीओ आहे.


व्हिडीओ पाहण्यासाठी येथे  क्लिक करा 


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies