Type Here to Get Search Results !

धक्कादायक : मोठ्या मुलीशी लग्न ठरलं असतानाही होणाऱ्या जावयाने अल्पवयीन मेहुणीलाच....



उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. होणाऱ्या जावयाने शाळेत जात असलेल्या अल्पवयीन मेहुणीलाच रस्त्यातून पळवून नेले आहे. 


गावातील तरुणीचे लग्न फतेहपूर शहरातील जगदीश यांचा मुलगा विजय याच्यासोबत ठरले होते. त्यांचा साखरपुडाही झाला होता. लग्नाचा बस्ता देखील बांधून झाला होता. डिसेंबरमध्ये या दोघांचे लग्न होणार होते. दरम्यान नवऱ्या मुलीची छोटी बहीण शहरातील एका कॉलेजमध्ये शिकते. 


१८ नोव्हेंबरला ती पायी चालत कॉलेजला जात होती. परंतू, कॉलेज बंद झाले तरी बराच वेळ होऊनही ती परत न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली. 


मुलीच्या आईने होणाऱ्या जावयाच्या घरी जाऊन मुलीबाबत माहिती घेतली. यावेळी जावईच त्या दिवशी सकाळपासून गायब असल्याचे तिला समजले आणि तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली. आपल्या लहान मुलीला फसवून होणाऱ्या जावयाने तिला पळवून नेले असा आरोप करत तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. 


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies