Type Here to Get Search Results !

आटपाडी : राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष यांच्यासह इतर सहा जणावर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल




माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांच्यासह इतर सहा जणांवर आटपाडी पोलिसात गुन्हे दाखल झाल्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. भारत तुकाराम पाटील रा. दिघंची यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी भारत तुकाराम पाटील यांची पिठाची गिरणीचा व्यवसाय आहे. यातील आरोपी हणमंतराव धोंडीसाहेब देशमुख, समाधन खंडू नळ (भोसले) यांच्यासह तोंडाला रुमाल बांधलेल्या इतर पाच अनोळखी लोकांनी भारत तुकाराम पाटील यांच्या पिठाच्या गिरणीचे लॉक तोडून जागा बळकाविण्याच्या गिरणीच्या शेडमध्ये प्रवेश करून गिरणीचे शेड मधील संसारपयोगी सहित शेड मधून बाहेर फेकून दिले व गल्यातील असणारे चार हजार रुपये हिसकावून घेवून घेतले. 


तसेच शेड मधील साहित्य बाहेर फेकून दिल्यावर शेडला दुसरे कुलूप लावून त्याचा कब्जा घेतला. याप्रकरणी भारत पाटील यांच्या फिर्यादी नुसार हणमंतराव धोंडीसाहेब देशमुख, समाधन खंडू नळ (भोसले) यांच्या इतर पाच अनोळखी लोकांच्यावर गुन्हा दाखल असून सदर प्रकरणी आटपाडी पोलीसा अधिक तपास करत आहेत.

 



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies