Type Here to Get Search Results !

आटपाडीत उद्या श्री साई कृषी उद्योग फर्मचे होणार उद्घाटन



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथे उद्या दिनांक ०३ रोजी  श्री साई कृषी उद्योग समुहाच्या दुसऱ्या शाखेचा उद्घाटन सोहळा सौ.मीनाक्षी व श्रीधर सीताराम विभूते यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.


या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थित म्हणून सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुहास बाबर, सांगली जिल्हा बँकेचे संचालक व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तानाजीराव पाटील, पुणे येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणारे निलप्रसाद चव्हाण, प्रगतशील बागायतदार दत्तात्रय कोळवले उपस्थित राहणार आहेत.


तरी सदर उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक तुषार विभूते व सौरभ विभूते यांनी केले आहे. उद्घाटन कार्यक्रम हा आटपाडी नगरपंचायत शेजारी, बाजार पटांगण या ठिकाणी उद्या दिनांक ०३ रोजी सकाळी १०.००  संपन्न होणार आहे.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies