Type Here to Get Search Results !

आटपाडी : डीसीसी बँकेच्या नेलकरंजी शाखेत ४८ लाखांचा अपहार : शाखाधिकारी व लिपिक निलंबित



माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आटपाडी तालुक्याेतील नेलकरंजी शाखेत शाखाधिकारी आणि लिपिकानेच तब्बल ४८ लाखांवर रकमेचा केल्याचा अपहार प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शाखाधिकारी मच्छिंद्र म्हारगुडे आणि लिपिक प्रतीक पवार या दोघांवर बँकेने तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. संबंधितांनी कमी वापर असलेल्या खात्यावरील ठेवी मोडल्याचे तसेच बँकेच्या मासिक व्याजातील रक्क म काढल्याचे स्पष्ट झाले आहे.


जिल्हा बँकेच्या नेलकरंजी शाखेत मासिक व्याजाच्या रकमेत तफावत आल्याचा संशय तालुका अधिकारीयांना आला त्यानंतर शाखेचे अंतर्गत तपासणी सुरू केली. त्यामध्ये अपहार केल्याचे उघडकीस आले. संबंधित शाखाधिकारी म्हारगुडे व लिपिक पवार यांनी दोघांनी संगनमताने अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जी खाती कमी वापराची आहेत, त्या खात्यावर जादाचे व्याज जमा करून त्यातून पैसे परस्पर काढले आहेत. त्यासाठी संबंधित खात्याच्या नावाने बँकेचे एटीएम स्वत:च घेतले त्याचा मागमुस संबंधित खातेदारांना लागू दिला नसून त्याच एटीएमवरून सर्व पैसे काढण्यात आले. प्राथमिक तपासणीमध्ये ५७ लाख ५९ हजार इतक्या रकमेचा अपहार दिसून येत आहे. त्यापैकी ४८ लाख रुपये खात्यावरून उचलले आहेत.


दरम्यान या प्रकरणी बँकेने संबंधितांना कारणे दाखवा नोटिसा बजावून तात्काळ निलंबनाची कारवाई केली. बँकेच्या लेखापरीक्षकांमार्फत शाखेची अंतर्गत तपासणी सुरू केली आहे. यामध्ये अपहाराची रक्कम वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बँकेकडून संबंधित शाखाधिकारी म्हारगुडे आणि लिपिक पवार यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी प्रशासनाला दिले आहेत.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies