Type Here to Get Search Results !

आटपाडी : तडवळेजवळ झालेल्या अपघातामध्ये युवकाचा जागीच मृत्यू ; एकजण गंभीर जखमी



माणदेश एक्सप्रेस न्युज ; आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील तडवळे येथे झालेल्या अपघातामध्ये युवकाचा जागीच मृत्यू झाला.  तर एक गंभीर जखमी आहे. किरण शंकर जगताप रा. माळेवाडी असे मयत युवकाचे नाव आहे. तर सतिश श्रीमंत शिंदे जखमीचे नाव आहे.


याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, माळेवाडी येथील किरण शंकर जगताप हे आटपाडीहून करगणी कडे  इरटीगा (एम.एच.१० सीए ०२३०) या गाडीने निघाले होते. तर करगणीहून आटपाडीकडे आयशर टेम्पो (एम.एच.१० एडब्ल्यू २२५७) हा निघाला होता. तडवळे गावानजीक दोन्ही गाड्या आल्या असता. या दोन्ही गाड्यांचा समोर-समोर अपघात झाला.


अपघाता नंतर गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव  घेत मदतकार्य सुरु केले होते. या भीषण अपघातामध्ये इरटीगा गाडी मधील किरण शंकर जगताप याचे जागीच निधन झाले. तर सतिश श्रीमंत शिंदे हा गंभीर जखमी झाला. या अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून सदर अपघाताची नोंद आटपाडी पोलीस ठाणे येथे झाली आहे किंवा नाही याबाबत माहिती समजली नाही. सदरचा अपघात हा दिनांक 20 रोजी रात्री ८.३० च्या दरम्यान झाला.


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies