Type Here to Get Search Results !

आटपाडीत "या" दिवशी होणार वाळू लिलाव ; सर्वात जास्त बोली लावेल त्याला मिळणार वाळूचा लिलाव



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात जप्त करण्यात आलेल्या वाळूचा लिलाव आज दिनांक ०६ रोजी सकाळी ११.०० वाजता होणार असल्याची माहिती तहसीलदार सागर ढवळे यांनी दिली.


आटपाडी तालुक्यामध्ये चोरून वाळू वाहतूक करण्याऱ्यावर महसूल प्रशासनाच्या भरारी पथकाने धाड टाकत वाळू चोरावर कारवाई केली आहे. यामध्ये चोरून वाळूची वाहतूक व विक्री करणारी वाळू ही आटपाडी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आणून ठेवली होती.


आता या जप्त करण्यात आलेल्या वाळूचा लिलाव हा आज दिनांक ०६ रोजी सकाळी ११.०० वा. तहसीलदार कार्यालय या ठिकाणी होणार आहे. तरी जे-जे वाळू घेण्यास इच्छुक असतील त्यांनी उपस्थित राहून या वाळू लिलाव मध्ये सहभाग घ्यावा. तसेच जो सर्वात जास्त बोली लावेल त्याला वाळूचा लिलाव देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सागर ढवळे यांनी दिली.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies