Type Here to Get Search Results !

आटपाडी : विवाहित महिलेवर बलात्कार : आरोपी विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : विवाहित महिलेवर बलात्कार करून त्याचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्या प्रकरणी फिर्यादीच्या फिर्यादीनुसार आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी, यातील आरोपी गणेश दत्ता बंडगर रा. आंबेवाडी याने फिर्यादीशी एक वर्षापासून मैत्री केली होती. फिर्यादी ही त्यांच्या मळ्यात गेली असता आरोपी गणेश दत्ता बंडगर याने पाठीमागून येवून फिर्यादीवर जबरद्स्ती करत शारीरिक संबंध प्रस्तापित केले. यावेळी आरोपीने त्याचे फोटो काढून घेतले होते.


आरोपी हा फिर्यादीस सदर फोटो दाखवून वेळोवेळी शरीरसुखाची मागणी करत होता. आरोपीने याबाबत फिर्यादीचे पतीस गाठून सदरचे फोटो व व्हायरल करण्याची धमकी दिली होती.


आरोपीच्या या त्रासाला कंटाळून फिर्यादीने आटपाडी पोलिसात फिर्याद दिली असून आरोपी विरुद्ध भा.दं. स.कलम 376(1), 354(ड), 506, 500 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.






إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies