Type Here to Get Search Results !

आटपाडी : अवैध जुगार अड्ड्यावर कारवाई : आठ इसम ताब्यात ; २६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील कुरुंदवाडी येथील अवैध जुगार अड्ड्यावर अपर पोलीस अधीक्षक यांनी कारवाई केली. या कारवाई मध्ये आठ लोकांना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल २६ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी तालुक्यातील कुरुंदवाडी येथील वगरे वस्ती या ठिकाणी अवैध जुगार मोठ्या प्रमाणत चालत असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक यांना गोपिनीय माहिती मिळाली होती. याबाबत त्यांनी खात्री करून या ठिकाणी छापा मारला.


यावेळी पत्राचे शेड मध्ये गोल टेबल करून १८ ते २० लोक जुगार खेळत असल्याच दिसले. पथक पोहचताच जुगार खेळणारे लोक हातातील पत्याची पाने टाकून पळून जावू लागली. पथकातील पोलिसांनी पळून जाणाऱ्या लोकांना ताब्यात घेतले. यामध्ये मोहन लक्ष्मण खर्जे (वय ४४ रा. विभूतवाडी ता. आटपाडी), सुरज पांडुरंग घोलप (वय २२ रा. रहिमतपूर ता. कोरेगाव, जि. सातारा), सचिन काशिनाथ माने (वय ४२ काळचौंडी ता. माण), मारुती नामदेव मोटे (वय ४२ रा, वरकुटे ता. माण), शंकर मारुती फडतरे ( वय ६९ रा. सातारा), गणेश बाळाराम राठोड (वय ५७ रा. विभूतवाडी ता .आटपाडी), उमेश सोपान गुरव (वय ५९ रा. वडजल ता. माण), विष्णू रामा माने (वय ६५ रा. झरे ता. आटपाडी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर जुगार अड्डा चालविणारा अर्जुन गवंड (रा. आटपाडी ता. आटपाडी) हा फरार झाला आहे.


पोलिसांनी यावेळी चलनी नोटा, १३ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, ९ दुचाकी गाड्या, ३ चार चाकी गाड्या यासह एकूण २६ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगस्त करण्यात आला. याबाबत आटपाडी पोलीसात गुन्हा नोंद असून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल व पुढील तपास आटपाडी पोलीस करत आहेत. 


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies