Type Here to Get Search Results !

आटपाडी : विशाल पाटील यांच्या समर्थनार्थ काँग्रेसच्या विधानसभा समन्वयकचा राजीनामा



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : सांगली लोकसभा मतदार संघातील उमेदवारीचा तिढा वाढतच चालला आहे. याठिकाणी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पै.चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली असून ती कायम ठेवण्यात आली आहे. काँग्रेसकडून इच्छुक असलेले विशाल पाटील काय करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.


विशाल पाटील यांना उमेदवारी जाहीर न झाल्याने जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील अनेक नेते राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. त्यातच जिल्हा काँग्रेस ओबीसीचे ग्रामीण अध्यक्ष व सिद्धेवाडीचे माजी सरपंच व विद्यमान चेअरमन आण्णासाहेब खोत त्यांनी राजीमाना दिला आहे.


आता आटपाडी तालुक्यातील खरसुंडीचे युवा नेते सचिन गुरव यांनी विशाल पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या ‘खानापूर-आटपाडी विधानसभा समन्वयक’  या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा जिल्हा काँग्रेस कमिटीकडे ई-मेल द्वारे पाठविला आहे. 



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies